Maharashtra teams announced for 45th National Kho Kho Championship
धाराशिव (क्री. प्र.) : राष्ट्रीय खो-खोच्या मैदानावर महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकवण्यासाठी राज्याचे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत! गुजरातमधील वडोदरा येथे रंगणाऱ्या ४५ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे बलवान संघ जाहीर झाले असून, कुमार गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी धाराशिवच्या जितेंद्र वसावे याच्याकडे, तर मुलींच्या संघाची कर्णधारपदाची धुरा सोलापूरच्या स्नेहा लामकाने हिच्याकडे सोपविण्यात आली आहे. २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकावर महाराष्ट्राचे नाव कोरण्याच्या निर्धाराने खेळाडू मैदानात उतरणार आहेत.