Sports News: महाराष्ट्र संघाचा सलग दुसरा विजय ,राष्ट्रीय टी-२० स्पर्धा . ऋषिकेश, ऋतुराज, रामकृष्ण चमकले

Maharashtra Cricket Victory : सय्यद मुश्ताक अली राष्ट्रीय टी-२० स्पर्धेत महाराष्ट्राने आसामवर पाच विकेट राखून विजय मिळवला. ऋषिकेश सोनावणेचे अर्धशतक आणि ऋतुराज गायकवाडच्या नाबाद खेळीमुळे संघाने सलग दुसरा विजय नोंदवला.
Maharashtra cricket team celebrates its five-wicket victory over Assam in the Syed Mushtaq Ali Trophy.

Maharashtra cricket team celebrates its five-wicket victory over Assam in the Syed Mushtaq Ali Trophy.

esakal

Updated on: 

मोहाली : पहिल्या दोन लढतींत पुद्दुचेरी व केरळ यांच्याविरुद्ध पराभूत झालेल्या महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाने हिमाचल प्रदेशनंतर आसाम संघावर पाच विकेट राखून विजय मिळवला.

महाराष्ट्राच्या सय्यद मुश्ताक अली या राष्ट्रीय टी-२० स्पर्धेतील क गटातील सलग दुसऱ्या विजयात रामकृष्ण घोष (४/४१), विवेक शेलार (३/३०), ऋषिकेश सोनावणे (५४ धावा) व ऋतुराज गायकवाड (नाबाद ४४ धावा) या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करीत मोलाचा वाटा उचलला.

Loading content, please wait...