Weightlifting Champions : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची ‘पॉवर’; खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : साईराज, तनुजाचा सुवर्ण धमाका
Khelo India : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या साईराज परदेशी व तनुजा पोळ यांनी वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या पदक यादीत लक्षणीय भर पडली आहे.
राजगीर (बिहार) : महाराष्ट्रातील खेळाडूंची खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी सोमवारीही कायम राहिली. मनमाडचा साईराज परदेशी याने वेटलिफ्टिंगमध्ये नव्या स्पर्धा विक्रमासह सोनेरी यशाला गवसणी घातली.