Sports News: महाराष्ट्राच्या दाेन्ही संघांची विजयी सलामी,राष्ट्रीय खो-खो स्पर्धा : आंध्र अन् हिमाचल प्रदेशचा पराभव

Junior National Kho Kho: गुजरातमध्ये सुरू असलेल्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने आंध्र प्रदेशला, तर मुलांच्या संघाने हिमाचल प्रदेशला पराभूत करत शानदार सुरुवात केली.
Maharashtra boys and girls teams celebrate their winning start at the Junior National Kho Kho Championship in Gujarat.

Maharashtra boys and girls teams celebrate their winning start at the Junior National Kho Kho Championship in Gujarat.

esakal

Updated on: 

गुजरात : महाराष्ट्राच्या दोन्ही (मुले व मुली) संघांनी गुजरात येथे सुरू असलेल्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने आंध्र प्रदेशचा ३०-१२ असा १८ गुणांनी, तर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने हिमाचल प्रदेशचा ३८-१८ असा २० गुणांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी एक डाव राखून विजय मिळवत या स्पर्धेतील आपली ताकद दाखवून दिली.

Loading content, please wait...