
Maharashtra Kabaddi Team : महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली. नाशिकच्या आकाश शिंदेकडे पुन्हा एकदा या संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे.
ओडिसा, कटक येथील जे. एन. बंदिस्त क्रीडा संकुल येथे २० ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ही स्पर्धा खेळविण्यात येईल. गतवर्षी अहिल्यानगर, महाराष्ट्र येथे झालेल्या ७०व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत धडक देत तृतीय क्रमांक मिळविला होता.