Sports News: नाशिकचा हर्षवर्धन केसरी विजेता; महाराष्ट्र केसरी कुस्ती;सोलापूरचा महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता

Maharashtra Kesari 2026 Highlights: नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरी कुस्ती जिंकली. महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता ठरला. वाघोलीत जोरदार कुस्ती सामना आणि बक्षिसे वितरण.
Sports News

Sports News

esakal

Updated on

वाघोली (पुणे): नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला (बाहुबली) धूळ चारत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा दुसऱ्यांदा खांद्यावर मिरवली. सोबतच फॉर्च्युनर या आलिशान मोटारीचा मानकरी ठरला.

यापूर्वी उपमहाराष्ट्र केसरीचा मानकरी असलेल्या महेंद्र गायकवाडला या किताबी लढतीत बाहुबली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुन्हा तो उपमहाराष्ट्र केसरीच राहिला. ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आगळीवेगळी ठरली.

लाखोंची बक्षिसे, आलिशान मोटारी देऊन वाघोलीकरांनी मल्लांना मालामाल केले. या वेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, मंत्री दत्ता भरणे, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. वाघोली आणि परिसरातील कुस्तीप्रेमींनी या लढतीसाठी मोठी गर्दी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com