१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

Maharashtra Kesari 2028 : नागपूर महानगरपालिका आणि नागपूर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
Maharashtra Kesari 2028

Maharashtra Kesari 2028

esakal

Updated on: 

कुस्तीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा नागपुरात रंगणार आहे. त्यामुळे विदर्भातील कुस्तीप्रेमींना राज्यातील नामांकित मल्लांचा कुस्तीचा थरार प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...