
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजने चांदीची गदा केली अर्पण
फुलेवाडी : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांचे आज राजश्री शाहू कुस्ती केंद्र चंबुखडी-शिंगणापूर येथील घरच्या तालमीत फटाक्याची आतषबाजी व वाद्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. आखाड्यातला लाल मातीत प्रवेश करताच त्यांने प्रथम मानाची चांदीची गदा हनुमान चरणी अर्पण करून नतमस्तक झाला.
पै.पृथ्वीराज पाटील शनिवारी सातारा येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजय झाला.त्यानंतर आज रविवारी सायंकाळी त्यांने श्री.ज्योतिबाचे दर्शन घेतले व थेट शिंगणापूर येथील घरच्या तालमीत आला.पृथ्वीराजचे आगमन होताच येथील आखाड्याचे वस्ताद जालिंदर मुंडे यांनी पुष्पहार घालून त्याचे अभिनंदन केले.यावेळी मल्लांनी व तालीम परिसरातील लोकांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली.शिंगणापूर रस्त्यावरून वाजत, गाजत,नाचत त्याची आखाडयापर्यंत मिरवणूक काढली.जागोजागी महिलांनी त्याचे औक्षण केले. आखाड्यात आल्यानंतर वस्ताद मुंडे यांनी त्याचा सत्कार केला.अवघ तीस किलो वजन असल्यापासून पृथ्वीराज शिंगणापूरचे कुस्ती केंद्रात नियमित सराव करत आहे.या आखाड्यात शंभर किलो वजन असणाऱ्या गणेश व सुरज मुंडे आदी पैलवानाबरोबर कुस्तीचे डावपेच खेळले.वस्ताद जालिंदर मुंडे,प्रशिक्षक शिवाजी पाटील(आमशी),सुनील फाटक(कोगे) यांच्या मार्गदर्शनाखाली गेली आठ वर्षे त्यांने शिंगणापूरच्या तालमीत सराव केला.
यावेळी बोलताना पै.पृथ्वीराज म्हणाला,तीस किलो वजन होते त्यापासून मी या तालमीत कुस्तीचे धडे घेत आहे. वस्ताद जालिंदर मुंडे व आखाड्याचे माझ्या यशात मोठे श्रेय आहे. वस्ताद मुंडे म्हणाले,जिद्द व चिकाटीच्या जोरावर पृथ्वीराजने यश मिळवले आहे.तो निगर्वी व आज्ञाधारक आहे. प्रशिक्षक सुनील फाटक म्हणाले, पृथ्वीराजची महाराष्ट्र केसरी होण्याची इच्छाशक्ती मोठी होती.त्यामुळे तो सातत्यपूर्ण सरावात कधीही कमी पडला नाही.सांगेल त्या गोष्टी तो नेहमी करायचा.सणावारालाही तो कधी गावी गेला नाही.सरावात खंड पडू दिला नाही,यामुळे तो यशस्वी झाला.
Web Title: Maharashtra Kesari Prithviraj Patil Rajshree Shahu Wrestling Center Welcome
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..