महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला लाखाचा धनादेश

Maharashtra Kesari Pruthviraj Patil
Maharashtra Kesari Pruthviraj Patil Sakal

सातारा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने सातारा येथे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari) कोल्हापुरच्या पृथ्वीराज पाटील (Pruthviraj Patil) याने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. त्याला दिवंगत महाराष्ट्र केसरी संजय पाटील आटकेकर यांच्या स्मरणार्थ एक लाखाच्या बक्षीसाचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र चॅम्पियन आणि संजय पाटील यांचे बंधू धनाजी पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले.

Maharashtra Kesari Pruthviraj Patil
Maharashtra Kesari : 21 वर्षांनंतर चंदेरी गदेवर कोल्हापूरचे नाव

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अकोला येथे 1994 साली आटके गावचे सुपूत्र संजय पाटील यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून सातारा जिल्हय़ाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. यावर्षीची स्पर्धा साताऱ्याच्या मातीत झाली. संजय पाटील यांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबीयांकडून जिल्ह्यातील मल्लांना नेहमीच प्रोत्साहन देत गोरगरीब मल्लांना मदत करण्याचे कार्य सुरू आहे. लाल मातीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि संजय पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र केसरी किताब पटकवणाऱ्या मल्लाला प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख रूपयांचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले होते.

Maharashtra Kesari Pruthviraj Patil
Maharashtra Kesari : आर्मी मॅन पृथ्वीराजनं मारलं मैदान; उचलली मानाची गदा

शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी झालेल्या लढतीत मुंबई पूर्वचा विशाल बनकर आणि कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांच्यात लढत झाली. त्यामध्ये कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने बाजी मारत महाराष्ट्र केसरीचा किताब आणि गदा पटकावली. त्याला पाटील व हिंदकेसरी वेताळ यांच्या हस्ते एक लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com