
अहिल्यानगरमध्ये आयोजित ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील एक गंभीर वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. प्रसिद्ध डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत, त्यांना लाथ मारली, ज्यामुळे संपूर्ण स्पर्धेचं वातावरण गोंधळात आलं. या वादामुळे स्पर्धेवर वाईट परिणाम झाला असून, कुस्तीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवराज राक्षे यांच्या या कृत्यामुळे, स्पर्धेत सहभागी इतर खेळाडू आणि प्रशिक्षकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.