महाराष्ट्र केसरी 2020 : बक्षिसाची रक्कम मिळालेलीच नाही; काका पवारांचा गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 January 2020

स्पर्धेच्या आयोजकांनी महाराष्ट्र केसरी या विजेत्याला दीड लाखाची तर उपविजेत्याला 75 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.  परंतु हे  बक्षीस कुस्तीगिरांना मिळालेले नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.

पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान आयोजकांनी महाराष्ट्र केसरीच्या विजेत्यासाठी जाहीर केलेली  बक्षिसाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार  संघातील वार्तालापात केला. 

हर्षवर्धन सदगीर पुन्हा कधीच 'महाराष्ट्र केसरी' खेळणार नाही, वाचा का?

 महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला फक्त वीस हजार रुपये मिळाले आहेत तर उपमहाराष्ट्र केसरी शेळकेला कोणतीही रक्कम मिळालेली नाही, असेही काका पवार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्पर्धेच्या आयोजकांनी महाराष्ट्र केसरी या विजेत्याला दीड लाखाची तर उपविजेत्याला 75 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.  परंतु हे  बक्षीस कुस्तीगिरांना मिळालेले नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. गटविजेत्यांना 20 हजार रुपये देण्याची, आयोजकांची घोषणा होती. त्यात शैलेश शेळकेला पैसे मिळायला हवे होते, तेही अद्याप मिळालेले नाहीत, असेही काका पवार यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Kesari Winners didnt receive prize money says Kaka Pawar