esakal | हर्षवर्धन सदगीर पुन्हा कधीच 'महाराष्ट्र केसरी'च्या रिंगणात खेळणार नाही, वाचा का?
sakal

बोलून बातमी शोधा

Harshavardhan Sadgir will not play Maharashtra Kesari again declares Kaka Pawar:

महाराष्ट्रातील मल्लांनी "महाराष्ट्र केसरी'पुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे व देशाचे नाव कमवावे. त्याकरिता हर्षवर्धन व शैलेश हे दोघेही तयारी करणार आहे. पण, हर्षवर्धन "महाराष्ट्र केसरी' स्पर्धेत उतरणार नाही.

हर्षवर्धन सदगीर पुन्हा कधीच 'महाराष्ट्र केसरी'च्या रिंगणात खेळणार नाही, वाचा का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'महाराष्ट्र केसरी 2020' किताबावर आपले नाव कोरावे, असे महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. ते एकदा पूर्ण झाले की, वेध लागतात ते डबल किंवा ट्रिपल 'महाराष्ट्र केसरी' होण्याचे. पण, या वर्षीचा "महाराष्ट्र केसरी' ठरलेला हर्षवर्धन सदगीर याला अपवाद ठरणार आहे. कारण, या पुढे तो "महाराष्ट्र केसरी'च्या स्पर्धेतच उतरणार नाही. याबाबतची घोषणा त्याचे प्रशिक्षक व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी आज केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

"महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढत काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्या रंगली. त्यात हर्षवर्धन याने "महाराष्ट्र केसरी'च्या गदेवर आपले नाव कोरले. या दोघांशीही पुणे श्रमिक पत्रकार संघात आज वार्तालाप झाला. त्यावेळी काका पवार यांनी हर्षवर्धन यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरणार नसल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मल्लांनी "महाराष्ट्र केसरी'पुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे व देशाचे नाव कमवावे. त्याकरिता हर्षवर्धन व शैलेश हे दोघेही तयारी करणार आहे. पण, हर्षवर्धन "महाराष्ट्र केसरी' स्पर्धेत उतरणार नाही. शैलेश ही स्पर्धा खेळेल. 

दोस्ती अन् कुस्ती : हर्षवर्धन-शैलेशच्या खिलाडूवृत्तीचा मेरी-झरीनने घ्यावा आदर्श!

एखादा पहिलवान घडविण्यासाठी प्रचंड मेहनत आणि खर्च करावा लागतो. "ट्रिपल महाराष्ट्र केसरी' मल्लाला पोलिस अधिकारी करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पण, हरियानामध्ये राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या मल्लाला सरकारी नोकरी मिळते. हर्षवर्धन व शैलेश हे दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या घरी फक्त दोन दोन एकर शेती आहे. त्यामुळे पहिलवानाला भविष्याची हमी पाहिजे, अशी मागणी काका पवार यांनी केली. 

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी भूगाव येथे "महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकाविल्यानंतर अभिजीत कटके याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी करत असे. असेच ध्येय सर्व मल्लांनी ठेवले पाहिजे, असे काका पवार म्हणाले.