

Maharashtra Kesari Wrestling
sakal
पुणे : वाघोली येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला स्थगिती देण्याची मागणी भारतीय शैली कुस्ती महासंघाने न्यायालयाकडे केली आहे. पारंपरिक भारतीय मातीवरील कुस्तीची परंपरा आणि ऐतिहासिक किताबांचे संरक्षण करण्यासाठी ही कायदेशीर पावले उचलल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.