
Maharashtra Shooters Won medals in 38th National Games: मराठमोळ्या नेमबाजांनी सुवर्णासह रौप्य व कांस्य पदकाच्या कमाई करीत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील त्रिशूल शूटिंग रेजवर महाराष्ट्राची पताका अभिमानाने फडकवली. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या १० मीटर एअर रायफल्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ माने या युवा खेळाडूने सोनेरी वेध घेतला, तर जागतिक सुवर्णपदक विजेता रुद्रांक्ष पाटील याने रुपेरी यश संपादन केले. सेनादलाचे प्रतिनिधित्व करणारा सातारा जिल्ह्यातील खेळाडू किरण जाधव याला कांस्यपदक मिळाले.