Maharashtra State School Chess Championship second stage 2026
मुंबई, १२ नोव्हेंबर : राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी स्थान मिळविण्यासाठी राज्यातील शालेय बुद्धिबळपटू महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाले आहेत. शुक्रवार, १३ नोव्हेंबरपासून दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू होणाऱ्या या तीन दिवसीय स्पर्धेत तब्बल ३८७ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
इंडियन चेस स्कूलच्या वतीने आयोजित या स्पर्धेत ९, १३ आणि १७ वर्षांखालील मुले व मुली अशा सहा फिडे मानांकित गटांत सामने खेळविण्यात येतील. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिले दोन क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे.