संघाने पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे ७ ते १० नोव्हेंबर २०२३ ला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा घेतली होती. त्यात आर्मीचे पाच पैलवान दुचाकीचे मानकरी ठरले होते.
कोल्हापूर : अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra Kesari Competition) कोणती, या विषयाभोवती चर्चेचे गुऱ्हाळ रंगलेले असताना, नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा केली आहे. येत्या २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगरात ही स्पर्धा होणार असून, संघाने रेल्वे, सैन्यदल (Army) व ग्रीकोरोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पदक विजेत्या पैलवानांना स्पर्धेत प्रवेश नाकारला आहे.