

Narsingh Yadav Dangal League, Maharashtra
Sakal
अर्जुन पुरस्कार विजेते व ऑलिम्पियन नरसिंह यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई) यांच्या संकल्पनेतून आणि नरसिंह फाउंडेशन तसेच नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नरसिंह यादव दंगल लीग’ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजयी झेंडा फडकावला.
विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे झालेल्या या एकदिवसीय कुस्ती लीगमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघातून ५ पुरुष व २ महिला अशा एकूण ७ खेळाडूंनी सहभाग घेतला असून, स्पर्धेत एकूण २८ कुस्तीपटूंनी आपली ताकद आजमावली.