
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ३३१ पदकविजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. यावेळी मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभही केला जाणार आहे.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग सभागृहात शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रीय क्रीडा दिन समारंभ होईल.