

Maharashtra U-17 Girls Cricket
sakal
पुणे : मुंबईत संपलेल्या सतरा वर्षांखालील मुलींच्या गटाच्या दुसऱ्या पश्चिम विभागीय एकदिवसीय साखळी क्रिकेट स्पर्धेत ईश्वरी अवसरेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने गुजरात संघावर आठ गडी राखून विजय प्राप्त करीत चौथ्या विजयासह सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान मिळविला. मुंबईत बुधवारी झालेल्या या लढतीत गुजरातने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राने २९.२ षटकांत दोन बाद २११ धावा करून विजय मिळविला.