
नवी दिल्ली : कल्याणमधील मराठमोळी कन्या वैष्णवी पाटील हिने उत्तुंग झेप घेतली आहे. निवड चाचणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत तिने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये प्रवेश केला. आता १३ ते २१ सप्टेंबर रोजी झॅगरेब येथे होत असलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील ६५ किलो वजनी गटात ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.