
माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा नुकतांच वाढदिवस साजरा झाला. यंदा वाढदिवस त्याने त्याचा 41 वा वाढदिवस इंग्लंडमध्ये साजरा केला. त्याचे फोटो व्हिडीओ चर्चेत असतानाच माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासोबतचा धोनीचा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.(mahendra singh dhoni spotted at nottingham chat with ravi shastri)
धोनी आणि शास्त्री रविवारी नॉटिंगहॅममध्ये एकत्र दिसले. ट्रेंट ब्रिज येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका पाहण्यासाठी दोघांनी मैदानात उपस्थिती लावली होती. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यावेळी दोघे एकमेकांसोबत चर्चा करताना दिसले. नेमकं दोघात कशावरुन चर्चा रंगली असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होताना दिसत आहे.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत. धोनी व्हाईट टी-शर्टमध्ये आहे.
ऋषभ पंतने यापूर्वी धोनीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या T20 मध्ये भारताच्या विजयानंतर त्याने धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तसेच त्याने यावेळी भारतीय खेळाडूंशी संवादही साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.