Virender Sehwag Tweet Virat Kohli : आता सेहवागने सुद्धा केलं ट्विट, कोहलीसाठी वाजली धोक्याची 'घंटा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

virender sehwag tweet is he giving warning to virat kohli

आता सेहवागने सुद्धा केलं ट्विट, कोहलीसाठी वाजली धोक्याची 'घंटा'

Virat kohli Eng vs Ind : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा काळ खूप वाईट जात आहे. एकेकाळी शतकी खेळी करणारा हा फलंदाज आता आपली विकेट वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये विराट पूर्णपणे फ्लॉप राहिला आहे. त्यामुळे तो यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचा भाग असेल की नाही, हे येणारा काळच सांगेल. (Virender Sehwag Tweet Is He Giving Warning To Virat Kohli)

हेही वाचा: विराट कोहलीवरून कपिल देव होतोय ट्रोल, उस्मान ख्वाजाने केली कमेंट

सध्याचा फॉर्म पाहता विराट कोहलीने संघात राहावे की नाही? यावर सर्व माजी क्रिकेटपटूंनी आपापली मते मांडली आहेत. कपिल देव यांच्या मते केवळ मोठ्या नावाच्या जोरावर खेळाडू संघात राहू शकत नाहीत, संघात राहण्यासाठी त्यांनी तशी कामगिरीही करायला हवी. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर सेहवागच्या ट्विटमध्ये विराटचे नाव नाही, परंतु हे ट्विट केवळ त्याच्यासाठीच करण्यात आल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: Fake IPL: क्रिकेटर, अंपायर सगळे नकली, गुजरातमध्ये उभं राहिलंय फेक IPL

सेहवागने ट्विटरवर लिहिले की, भारतात सुरुवातीपासून नेतृत्व करू शकणारे बरेच फलंदाज आहेत, परंतु त्यापैकी काही असे आहेत जे दुर्दैवाने बाहेर बसले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सध्याच्या फॉर्ममध्ये उपलब्ध सर्वोत्तम खेळाडूंना खेळवण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे. मात्र, रोहित शर्माने विराटचा सातत्याने बचाव केला आहे.

हेही वाचा: भारताचे आभार मानून! जयसूर्या लागलाय लंकेचा राष्ट्रपती होण्याच्या तयारीत?

विराट कोहलीला दोन वर्षांत कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक करता आले नाही. इंग्लंडविरुद्ध टी-20 फॉरमॅटमध्ये त्याची खराब कामगिरी कायम राहिली, त्याला दोन डावात केवळ 12 धावा करता आल्या. आयर्लंड दौऱ्यावर शतक झळकावणाऱ्या दीपक हुड्डालाही त्याच्यामुळेच बाहेर पाठवण्यात आले. याच कारणामुळे कोहलीच्या संघात राहण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.


Web Title: Virender Sehwag Tweet Is He Giving Warning To Virat Kohli Sports Cricket Eng Vs Ind

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top