MS Dhoni Statue: महेंद्रसिंग धोनीचा मेणाचा पुतळा व्हायरल, चाहते भडकले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni Statue

MS Dhoni Statue: महेंद्रसिंग धोनीचा मेणाचा पुतळा व्हायरल, चाहते भडकले...

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मेणाचा पुतळा सध्या सर्वत्र व्हायरल होतोय. कर्नाटकातील म्हैसूर येथील चामुंडेश्वरी वॅक्स म्युझियममध्ये धोनीचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आलाय. मात्र हा पुतळा त्याच्या आकारामुळे सोशल मीडियावर ट्रोल होतोय. हा पुतळा धोनीसारखा दिसत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा पुतळ्याबाबत भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या मते म्हैसूरच्या वॅक्स म्युझियममध्ये असलेल्या धोनीच्या मेणाचा पुतळ्याचा आकार जसा हवा तसा नसल्याने पुतळा धोनीसारखा दिसत नाही असे अनेकांचे म्हणणे पडले. हा भारताच्या माजी कर्णधाराचा अपमान असल्याची भावना अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या कमेंट्सद्वारे व्यक्त केली आहे. त्यामुळे या पुतळ्याच्या मीम्सही सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहेत.

महेंद्रसिंग धोनी यांचे जगभर फॅन्स आहेत. त्यांच्या मेणाचा पुतळा जेव्हा चाहत्यांपुढे आला तेव्हा त्यांचा प्रचंड संताप झाला. कारण त्यांना हा पुतळा धोनीसारखा असल्याचे वाटत नाही. त्यामुळे वॅक्सम्युझियमवर देखील टीका करण्यात आल्या. तसेच या पुतळ्यासंबंधित अनेक मीम्सदेखील व्हायरल झाल्यात.

धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तो क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये एक मानला जातो. त्याने भारताचे नेतृत्व करताना 2007 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2011मध्ये वनडे विश्वचषक जिंकलाय. तसेच त्याने 2013च्या विजेत्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचे कर्णधारपद भुषविले होते. त्याने 90 कसोटी सामने खेळताना 4876 धावा केल्या. तर 350 वनडे सामन्यात 10773 धावा केल्या. तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1617 धावा केल्या.