Maheshwari Chauhan: महेश्‍वरीने मिळवला ऑलिंपिक कोटा; पात्रता फेरीत रौप्यपदकावर मोहोर

भारताची नेमबाज महेश्‍वरी चौहान हिने रविवारी संस्मरणीय कामगिरी केली. तिने महिलांच्या स्कीट प्रकारात रौप्यपदकाची कमाई करीत भारताला पॅरिस ऑलिंपिकसाठीचा कोटा मिळवून दिला.
Maheshwari Chauhan secured issf olympic quota shooting qualification shotgun 2024 india
Maheshwari Chauhan secured issf olympic quota shooting qualification shotgun 2024 india Sakal

नवी दिल्ली : भारताची नेमबाज महेश्‍वरी चौहान हिने रविवारी संस्मरणीय कामगिरी केली. तिने महिलांच्या स्कीट प्रकारात रौप्यपदकाची कमाई करीत भारताला पॅरिस ऑलिंपिकसाठीचा कोटा मिळवून दिला. हा भारताचा २१ वा ऑलिंपिक कोटा ठरला. दोहा येथे पॅरिस ऑलिंपिकची पात्रता फेरी आयोजित करण्यात आली होती.

महेश्‍वरी चौहान हिने रौप्यपदक जिंकत ऑलिंपिक कोटा मिळवल्यानंतर आनंदी भावना व्यक्त केली. ती म्हणाली, गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मेहनत केली आहे. त्यामुळे साहजिकच आनंद होत आहे. शूट ऑफमध्ये थोडीशी बिथरली.

मात्र माझ्या कामगिरीने समाधानी आहे. दरम्यान, भारताची महेश्‍वरी चौहान व चिलीची फ्रान्सिस्का चाडीड यांच्यामध्ये ६० शूटनंतर ५४-५४ अशी बरोबरी झाली. त्यामुळे शूटऑफचा अवलंब करण्यात आला.

यामध्ये फ्रान्सिस्का हिने महेश्‍वरी हिला ४-३ असे पराभूत केले. त्यामुळे फ्रान्सिस्का हिने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. महेश्‍वरीला रौप्यपदक मिळाले. ती पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली होती. चीनच्या जियांग यितींग हिने ब्राँझपदकाची कमाई केली.

दरम्यान, पात्रता फेरीत सहा नेमबाजांनी यश मिळवले. लार्सन व्हिक्टोरिया, फ्रान्सिस्का चाडीड, असेम ओ. महेश्‍वरी चौहान या चारही नेमबाजांनी पात्रता फेरीत १२१ गुणांची कमाई केली होती. रिगिना एम. हिने १२० गुण, तर जियांग यितींग हिने ११९ गुण कमवले. त्यानंतर मात्र मुख्य अंतिम फेरीत जियांग यितींग हिने ४५ गुणांसह ब्राँझपदक पटकावले. तसेच फ्रान्सिस्का व महेश्‍वरी यांना ५४ गुणांच्या बरोबरीनंतर शूट ऑफमध्ये लढावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com