

Women's Maharashtra Kesari
Sakal
Women’s Maharashtra Kesari Wrestling Tournament: सोलापूर येथे दिनांक २८ आणि २९ मार्चला चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेकडे स्पर्धेचे संयोजनपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार आहे. यापूर्वी तिने तीन वेळा हा किताब जिंकला होता.
निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक सौ. स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही स्पर्धा सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरात असलेल्या हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.