
नवी दिल्ली : ‘हॉकीचे जादूगार’ असा उत्स्फूर्तपणे मिळणारा सन्मान...त्यांच्या नावे दिला जात असलेला देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आणि त्यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येत असताना तसेच देशभरातील अनेक स्टेडियम त्यांच्या नावे उभी असताना मेजर ध्यानचंद यांना अद्याप ‘भारतरत्न’ हा पुरस्कार मिळालेला नाही.