श्रीलंकेचा मलिंगाला विजयी निरोप 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचा सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला शुक्रवारी श्रीलंकेने विजयी निरोप दिला. कुशल परेराच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशाचा 91 धावांनी पराभव केला.

कोलंबो ः एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचा सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला शुक्रवारी श्रीलंकेने विजयी निरोप दिला. कुशल परेराच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशाचा 91 धावांनी पराभव केला.

कुशल परेराच्या (111) शतकी खेळीला कौशल मेंडिस (43) आणि एंजेलो मॅथ्यूज (48) यांची साथ मिळाल्यामुळे श्रीलंकेने 50 षटकांत 8 बाद 314 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशाचा डाव 41.4 षटकांत 223 धावांत संपुष्टात आला. मुशफीकूर रहिम (67) आणि शब्बीर रेहमान (60) यांना अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही.

श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने 38 दावांत 3, तर नुआन प्रदीपने 51 धावांत 3 गडी बाद केले. धनंजय डिसिल्वाने 49 धावांत 2 गडी बाद करून त्यांना साथ केली. मलिंगाने या कामगिरीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 338 बळी मिळवत भारताच्या अनिल कुंबळेला (337) मागे टाकले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malinga stars to help Sri Lanka beat Bangladesh by 91 runs