esakal | सहा वर्षांनंतर सिटी उपांत्य फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

Football News

सहा वर्षांनंतर सिटी उपांत्य फेरीत

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

ड्रॉटमंड : उत्तरार्धात दोन शानदार गोल करून मँचेस्टर सिटीने बोरुसिया ड्रॉटमंडचा २-१ असा पराभव करून चॅम्पियन्स लीग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. सहा वर्षांनंतर त्यांनी ही कामगिरी केली आहे.

ड्रॉटमंडविरुद्ध पहिल्या टप्प्यात मिळवलेल्या विजयात सिटीकडून विजयी गोल करणाऱ्या फोडेनने या दुसऱ्या टप्प्यातील लढतीतही ७६ व्या मिनिटाला गोल केला. त्याअगोदर ५५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर माऱ्हेझने अचुक लक्ष्यभेद केला. सिटीनी ड्रॉटमंडविरुद्ध ४-२ अशा सरासरीने बाजी मारली.

दुसऱ्या टप्प्यातील या सामन्यात पहिला गोल नोंदवला होता तो ड्रॉटमंडने. १५ व्या मिनिटालाच स्ट्रायकर एर्लिंग हॅलांडने गोल केला. हा त्याचा चॅम्पियन्स लीगमधील पहिला गोल होता, पण या गोलपासून ड्रॉटमंडच्या इतर खेळाडूंना स्फूर्ती घेता आली नाही.

प्रीमियर लीगमध्ये आघाडीवर असलेले मँचेस्टर सिटी चॅम्पिन्स लीगमध्ये गेली तीन वर्षे उपांत्यपूर्व फेरीतच बाद होत आहेत. यंदा हा अडथळा त्यांनी थाटात पार केला. आता उपांत्य सामन्यात त्यांचा सामना नेमार आणि एम्बापे यांच्या पीएसजीविरुद्ध होणार आहे. सिटीचे मार्गदर्शक पेप गॉर्डिओलो यांच्यासाठी ही मोठी प्रगती आहे. मार्गदर्शक म्हणून ते आठवड्यांना उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले आहे. अशी कामगिरी याअगोदर दिग्गज मार्गदर्शक जॉस मॉरिन्हो यांनी केली होती.

रेयाल माद्रिदच्या बसवर हल्ला

लिव्हरपूल ः उपांत्यपूर्व सामन्यासाठी स्टेडियमकडे जात असलेल्या रेयाल माद्रिदच्या बसवर लिव्हरपूल परिसरात हल्ला करण्यात आला. बसवर बाटल्या फेकण्यात आल्या. रेयाल माद्रिद आणि लिव्हरपूल यांच्यातील दुसऱ्या टप्प्याचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला आणि ३-१ अशा सरासरीवर रेयालने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात त्यांची लढत चेल्सीविरुद्ध होईल.