हॉकी : भारताकडून जपानचा 4-3 असा पराभव

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

रुपींदरपाल सिंगने आठव्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र जपानने 45 व्या मिनिटापर्यंत तीन गोल करत 3-1 अशी मोठी आघाडी घेतली. अखेर मनदीपसिंगने 45, 51 आणि 58 मिनिटांना गोल करत भारताने विजय नोंदविला.

इपोह (मलेशिया) - मनदीपसिंगने केलेल्या हॅटट्रिकमुळे भारताने सुलतान अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत आज (बुधवार) जपानचा 4-3 असा पराभव केला. 

मंगळवारी ऑस्ट्रेलियाकडून 3-1 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आज जपानविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघ 3-1 असा पिछाडीवर असताना 4-3 असा विजय मिळविला. या विजयामुळे भारताच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या अजुनही जिवंत आहेत.  

भारताने आतापर्यंत या स्पर्धेत दोन विजय नोंदविले असून, ब्रिटनविरुद्धचा सामना बरोबरीत राहिला होता. रुपींदरपाल सिंगने आठव्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र जपानने 45 व्या मिनिटापर्यंत तीन गोल करत 3-1 अशी मोठी आघाडी घेतली. अखेर मनदीपसिंगने 45, 51 आणि 58 मिनिटांना गोल करत भारताने विजय नोंदविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mandeep singh glorious hat-trick India to a thrilling 4-3 victory over Japan in the Sultan Azlan Shah Cup