IPL Mandira Bedi : मंदिरा बेदी परतणार! गुणवान खेळाडूंना 'क्रिकेट का तिकीट' देणार

Mandira Bedi Will Be Back As Cricket Host
Mandira Bedi Will Be Back As Cricket Host esakal

IPL Mandira Bedi Cricket Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सर्वात प्रथम ग्लॅमरचा तडका देण्याणारी अभिनेत्री मंदिरा बेदी आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. आयपीएलची फ्रेंचायजी राजस्थान रॉयल्स आणि कलर्स या वाहिनीने मिळून एक नवा कोरा क्रिकेट रियलिटी शो लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. हा शो ग्लॅमरस आणि प्रसिद्ध क्रिकेट प्रेझेंटर मंदिरा बेदी होस्ट करणार आहे. 'क्रिकेट का तिकीट' असं या शोचं नाव आहे. या शो द्वारे देशभरातील गुणवान क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Mandira Bedi Will Be Back As Cricket Host
BCCI New Selection Committee : BCCI चा यू टर्न! चेतन शर्मांसाठी व्यंकटेश प्रसादला का डावलले?

मंदिरा बेदी ही क्रिकेट जगतात क्रिकेट प्रेझेंटरचा ट्रेंड सुरू करणाऱ्यांपैकी एक मॉडेल म्हणून ओळखली जाते. आता ती क्रिकेट का तिकीट नावाचे एक नवा कोरा शो होस्ट करणार आहे. या शोद्वारे देशातील गुणवान पुरूष आणि महिला क्रिकेटपाटूंना शोधणे आणि त्यांना पैलू पाडण्याचे काम केले जाणार आहे. हा शो 8 भागात प्रसारित होणार आहे. (Sports Latest News)

Mandira Bedi Will Be Back As Cricket Host
AUS vs RSA VIDEO : मार्नसने सामना सुरू असतानाच मागितले सिगारेट लायटर; मागणी पूर्णही झाली!

या शोमध्ये इच्छुकांनी त्यांची प्रवेशिका ही क्रिकहिरोज अॅप द्वारे 15 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायच्या आहेत. या शोमधील जिंकणाऱ्या महिला आणि पुरूष खेळाडूंना 5 लाख रूपये कॅश प्राईज आणि भविष्यासाठी डेव्हलपमेंट प्रोग्राम देण्यात येईल. या डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये विजेत्या खेळाडूला एक वर्षासाठी राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफ, खेळाडूंकडून मार्गदर्शन लाभणार आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com