VIDEO : मार्नसने सामना सुरू असतानाच मागितले सिगारेट लायटर; मागणी पूर्णही झाली! | AUS vs RSA Marnus Labuschagne Cigarette Lighter | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia Vs South Africa Marnus Labuschagne Cigarette

AUS vs RSA VIDEO : मार्नसने सामना सुरू असतानाच मागितले सिगारेट लायटर; मागणी पूर्णही झाली!

Australia Vs South Africa Marnus Labuschagne Cigarette : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झाला. यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या कसोटीच्या पहिल्या दिवशीच कांगारूंच्या खेळाडूंची ड्रामेबाजी पहायला मिळाली.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्नस लाबुशेनने अचानक मैदानावरूनच सिगारेट लायटग मागवले. यामुळे क्रिकेट चाहते प्रचंड गोधळले. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs SL: घाई केलीस लेका! जसप्रीत बुमराहवर चाहते जाम भडकले

ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेन डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आला. त्याने सलामीवीर उस्मान ख्वाजासोबत दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र अचानक मार्नसने ड्रेसिंग रूमकडे सिगारेटचा इशारा केला. यामुळे चाहत्यांसकट समालोचकही गोंधळले.

काही वेळात ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममधून खेळाडू सिगारेट लायटर घेऊन मैदानात धावले. दरम्यान, लाबुशेनने आपले हेलमेट काढले आणि लायटरने हेलमेटमधून बाहेर आलेले नायलॉनचे धागे जाळून टाकले. खरं म्हणजे लाबुशेनला फलंदाजी करताना या हेलमेटमधून बाहेर आलेल्या या नायलॉनच्या धाग्यांचा त्रास होत होता.

म्हणूनच लाबुशनने ड्रेसिंग रूमकडे सिगारेटचा इशारा करत सिगारेट पेटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लायटरची मागणी केली. (Sports Latest News)

हेही वाचा: IND vs SL : 200 कोटींचा फटका! मालिकेच्या पहिल्याच सामन्याने स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टारचे धाबे दणाणले

मात्र मार्नसचे इशारे पाहून अनेकांना लाबुशेनला सामना सुरू असतानाच सिगारेट ओढण्याची तलफ कशीकाय आली असा प्रश्न पडला होता. नंतर उलगडा झाला की मार्नसला सिगारेट ओढण्यासाठी नाही तर नायलॉनचे धागे जाळण्यासाठी लायटर हवा होता.

दरम्यान, लाबुशेनने आपले 14 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याने 151 चेंडूत 79 धावांची खेळी केली. मात्र त्याला नॉर्खियाने बाद केले. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 147 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा 121 चेंडूत 54 धावा करून नाबाद होता तर स्टीव्ह स्मिथ नुकताच क्रीजवर आला होता. मात्र अंधुक प्रकाशामुळे सामना दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट