111.83 च्या स्ट्राईक रेटने ठोकले द्विशतक! मनिष पांडेने IPL मध्ये करोडो रूपयांची बोली लागताच केला धमाका | Manish Pandey Ranji Trophy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Pandey Ranji Trophy

Ranji Trophy : 111.83 च्या स्ट्राईक रेटने ठोकले द्विशतक! मनिष पांडेने IPL मध्ये करोडो रूपयांची बोली लागताच केला धमाका

Manish Pandey Ranji Trophy : भारताचा अनुभवी फलंदाज मनिष पांडेने रणजी ट्रॉफीच्या कर्नाटक आणि गोवा सामन्यात मोठा धमाका केला. मनिष पांडेवर नुकत्याच झालेल्या आयपीएल 2023 हंगामासाठी झालेल्या मिनी लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 2.4 कोटी रूपयांची बोली लावली होती. याच 33 वर्षाच्या मनिष पांडेने रणजी ट्रॉफीत द्विशतक ठोकले. हे द्विशतक साधारण द्विशतक नव्हते. तर पांडेजींनी फक्त 186 चेंडूत 111.83 च्या स्ट्राईक रेटने 208 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे गोव्याच्या एकाही गोलंदाजाला त्याला बाद करण्यात यश आले नाही.

हेही वाचा: Jasprit Bumrah : NCA ने जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर दिली मोठी अपडेट; BCCI ने दिले होते स्पष्ट आदेश

मनिष पांडेसाठी गेली काही वर्षा फार चांगली गेलेली नव्हती. त्याला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. याचबरोबर त्याची आयपीएलमध्ये देखील लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता. मनिष पांडेने 2008 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आयपीएलची आपली कारकिर्द सुरू केली होती. त्यानंतर तो 2014 ते 2017 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळला. यावेळी त्याने चांगली कामगिरी केली होती. 2014 च्या आयपीएल फायनलमध्ये सामना जिंकून देणारी खेळी केली.

मनिष पांडेला 2018 मध्ये सनराईजर्स हैदराबादने 11 कोटी रूपयांना खरेदी केले. मात्र सनराईजर्स हैदराबादमध्ये त्याच्या बॅटला ग्रहण लागले. त्याच्या बॅटमधून येणारा धावांचा ओघ ओसरला. अखेर हैदराबादने त्याला रिलीज केले. 2022 च्या मेगा लिलावात त्याला लखनौ सुपर जायंट्सने आपल्या गोटात घेतले. मात्र त्याला 6 सामन्यात 88 धावाच करता आल्या. आता तो दिल्ली कॅपिटल्सच्या कळपात सामिल झाला आहे.

हेही वाचा: PAK vs NZ : अज्ञान दुसरं काय! बाबर आजारी काय पडला पाकिस्तानचे दोन किपर कॅप्टन्सीवरून...

मनिष पांडे हा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. त्याने आतापर्यंत 160 आयपीएल सामने खेळले असून 29.90 च्या सरासरी आणि 121.52 च्या स्ट्राईक रेटने 3648 धावा केल्या आहेत.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....