माझं नक्की काय चुकतंय ते सांगा; मनोज तिवारी भडकला

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

बीसीसीआयने दुलिप करंडकासाठी तिन्ही संघाची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यातील एकही संघात बंगालचा कर्णधार मनोज तिवारीला स्थान न मिळाल्याने त्याने ईस्ट झोनच्या निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

नवी दिल्ली : बीसीसीआयने दुलिप करंडकासाठी तिन्ही संघाची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यातील एकही संघात बंगालचा कर्णधार मनोज तिवारीला स्थान न मिळाल्याने त्याने ईस्ट झोनच्या निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

''गेल्या वर्षी जेव्हा मला दुलिप करंडकासाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते तेव्हा मी देवांग गांधी यांच्याची बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मला या प्रकरणात पारदर्शकता हवी होती आणि म्हणूनच मी त्यांना माझी आकडेवारी मेसेज सुद्धा केली होते. मात्र, त्यांनी मला कोणताच प्रतिसाद दिला नाही. आमच्याच झोनच्या मिवड समितीच्या सदस्याने आमची बाजू न मांडणे हे फार वाईट आहे. निवड समितीचे सदस्य म्हणून ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत,'' अशा शब्दांत त्याने गांधींवर टीका केली आहे. 

17 ऑगस्टपासून बंगळूरमध्ये दुलिप करंडकाला सुरवात होणार आहे. इंडिया रेड, इंडिया ग्रीन आणि इंडिया ब्लू या तीन संघाचे नेतृत्व अनुक्रमे प्रियांक पांचल, फैज फजल आणि शुभमन गिल यांच्याकडे देण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करुनही या संघांमध्ये मनोजला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळेच त्याने गांधींवर टीका केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manoj Tiwary slams East Zone Selector After Duleep Trophy Omission