
Dhyan Chand Khel Ratna award: क्रीडापटूंसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराच्या शिफारशीतून जाणीवपूर्व वगळण्यात आल्याबद्दल मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा प्राधिकर यांना दोषी धरले आहे.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये एक नव्हे तर दोन पदके मिळवणाऱ्या मनू भाकरला खेलरत्न पुरस्काराच्या शिफारशीतून वगळण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकाराला जसपाल राणा यांनी थेट भारतीय क्रीडा क्षेत्राची प्रमुख जबाबदारी असलेल्या या दोघांना दोषी धरले आहे.