
Manu Bhaker on Khel Ratna : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी केली होती. तिने दोन कांस्यपदकं जिंकली आणि एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती स्वातंत्र्यानंतरही पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. पण, हा पराक्रम करूनही मानाच्या खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस न झाल्याने मनू दुखावली आहे आणि तिने तिची नाराजी व्यक्त केली आहे. तिचे वडील Ram Kishan Bhaker यांनीही संताप व्यक्त केला आहे. लेकीला नेमबाज बनवण्याऐवजी क्रिकेटपटू बनवलं असतं तर पुरस्कारासाठी भीक मागावी लागली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.