

FIFA World Cup 2026
esakal
बर्लीन : चाळीस वर्षीय गोलरक्ष मॅन्यूएल न्यूएर याचे जर्मनीच्या फुटबॉल संघात पुनरागमन झाले आहे. मुख्य प्रशिक्षक ज्युलियन नगेल्समन यांनी जर्मनीच्या २६ खेळाडूंच्या नावांची घोषणा गुरुवारी केली. फुटबॉल विश्वकरंडकासाठी जर्मनीचा संघ जाहीर करण्यात आला. युरोपियन चॅम्पियनशिपनंतर मॅन्यूएल न्यूएर याने निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मात्र विश्वकरंडकासाठी त्याला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला आहे.