esakal | भारताविरुद्ध चमकलेल्या क्‍लासेनला आफ्रिकेच्या कसोटी संघात संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

Henrich Klaasen

भारताविरुद्ध चमकलेल्या क्‍लासेनला आफ्रिकेच्या कसोटी संघात संधी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जोहान्सबर्ग : भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेमध्ये गुणवत्ता दाखवून दिलेला नवोदित यष्टिरक्षक हेन्रिक क्‍लासेनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वियान मल्डर या अष्टपैलूलाही संघात संधी देण्यात आली आहे. 

अष्टपैलू ख्रिस मॉरिस आणि अँडिल फेहलुकवायो, वेगवान गोलंदाज ड्युने ऑलिव्हर या तिघांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये या तिघांचाही समावेश होता. 

दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेस मुकलेले फाफ डू प्लेसिस, क्विंटन डिकॉक, एबी डिव्हिलियर्स आणि टेम्बा बावुमा हे सर्व महत्त्वाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मात्र संधी मिळालेली नाही. 

गेल्या वर्षी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या संघात क्‍लासेनचा समावेश होता; पण एकाही सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. दक्षिण आफ्रिकेतील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये क्‍लासेनने 48.66 च्या सरासरीने 292 धावा फटकाविल्या होत्या. तसेच, भारताविरुद्धच्या एका एकदिवसीय आणि एका ट्‌वेंटी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात क्‍लासेनचा महत्त्वाचा वाटा होता. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ 
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम आमला, टेम्बा बावुमा, क्विंटन डिकॉक (यष्टिरक्षक), थेउनिस डी ब्रुन, एबी डिव्हिलियर्स, डीन एल्गर, हेन्रिक क्‍लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, मॉर्ने मॉर्केल, वियान मल्डर, लुंगी एन्गिडी, व्हरनॉन फिलॅंडर, कागिसो रबाडा. 

loading image
go to top