पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 3 डिसेंबरला 

भास्कर जोशी
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे : यंदाची 32 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा येत्या 3 डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा पुण्याच्या महापौर आणि संयोजन समितीच्या स्वागताध्यक्ष मुक्ता टिळक यांनी आज (सोमवार) केली. या स्पर्धेची घोषणा करण्यासाठी पीवायसी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. 

यंदा या स्पर्धेत एकूण 40 लाख रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत. स्पर्धेचा मार्ग मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच असणार आहे. यंदापासून या स्पर्धेचे आयोजन सर्व पुणेकर आणि पुणे मॅरेथॉन ट्रस्ट यांच्यातर्फे केले जाणार आहे. यापूर्वी पुणे इंटरनॅशनल ट्रस्टतर्फे मॅरेथॉनचे आयोजन केले जात असे. 

'पुण्यातील मॅरेथॉन ही संस्थेची नव्हे, तर सर्व पुणेकरांची चळवळ बनली आहे. त्यामुळे यंदापासून सर्व पुणेकर आणि ट्रस्ट यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे', असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. यावेळी पुणे मॅरेथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्‌घाटनही महापौर टिळक यांच्या हस्ते झाले. 

यावेळी ऍड. अभय छाजेड, आमदार दीप्ती चवधरी, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले, प्रल्हाद सावंत उपस्थित होते.

Web Title: marathi news marathi websites Pune news Pune International Marathon