esakal | मेस्सीचा चार गोलचा धडाका 
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel Messi

मेस्सीचा चार गोलचा धडाका 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बार्सिलोना : लिओनेल मेस्सीच्या धडाकेबाज चार गोलमुळे बार्सिलोनाने ला लिगा अर्थातच स्पॅनिश लीग फुटबॉलमधील यशोमालिका कायम राखली. त्यांनी एबारचा 6-1 असा सहज धुव्वा उडवत आपले अग्रस्थान भक्कम केले. 

पॉलिन्हो आणि डेनिस सुआरेझ यांनी सलग दुसऱ्या सामन्यात गोल केले. त्याच वेळी बार्सिलोनाने पारंपरिक प्रतिस्पर्धी रेयाल माद्रिदला आता सात गुणांनी मागे टाकले आहे. 'मेस्सीने चार गोल करणे, यात आता काही नवीन राहिलेले नाही. त्याने ही कामगिरी अनेकदा केली आहे. हे तो सातत्याने करीत आहे आणि तेच महत्त्वाचे आहे', असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक एर्नेस्टो वॅलवेर्दे यांनी सांगितले. मेस्सीने कारकिर्दीत 43 व्यांदा हॅटट्रिक केली आहे. 

मेस्सीला केंद्रस्थानी ठेवत वॅलवेर्दे यांनी संघात मोठे बदल केले. त्यातील महत्त्वाचा म्हणजे लुईस सुआरेझही राखीव होता. त्यांनी बदली खेळाडूंची फौज उतरवली. त्यातील पॉलिन्हो याने प्रभावी कामगिरी केली. मेस्सीने 21 व्या मिनिटाला खाते उघडले. त्याने संघाचे अखेरचे तीन गोलही केले. त्यातील अखेरचा गोल दोन मिनिटे असताना केला होता. 

बार्सिलोनाने दुसऱ्य क्रमांकावरील व्हॅलेन्सियाला पाच गुणांनी मागे टाकले आहे. सेविला लास पामासविरुद्ध पराजित झाले. त्याच वेळी व्हॅलेन्सियाने मॅलागाचा 5-0 धुव्वा उडवत तिसरा क्रमांक मिळविला. सेविला आणि व्हॅलेन्सिया यांच्यात एकाच गुणाचा फरक आहे. सिमॉन झॅझा याची हॅटट्रिक हे व्हॅलेन्सियाच्या विजयाचे वैशिष्ट्य. सलग पाचव्या पराभवामुळे मॅलागा तळाला गेले आहेत. 

loading image
go to top