सौराष्ट्राचा महाराष्ट्रवर 5 गडी राखत निर्विवाद विजय, धमेंद्र जडेजाची हॅटट्रीक

live
live

नाशिक  सौराष्ट्रच्या धमेंद्र जडेजाने हॅटट्रीक नोंदविण्यासह महाराष्ट्राचा निम्मा संघ(55 धावात 7 बळी) गारद करत बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेच्या जोरावर महाराष्ट्रावर पाच गडी राखून निर्विवाद विजय मिळवला. या विजयामुळे सौरष्ट्रला सहा गुण मिळाले असून "अ'गटात 25 गुणासह हा संघ अव्वलस्थानी आहे. महाराष्ट्राच्या रोहित मोटवाणीने पंधरा चौकारांद्वारे झळकविलेल्या नाबाद 120 धावा हे डावाचे वैशिष्ठय ठरले. येत्या 22 तारखेपासून मुंबईत सौराष्ट्रची गाठ बलाढय मुंबई तर रायपूरमध्ये महाराष्ट्रचा छत्तीसगडबरोबर मुकाबला होईल. 

सामन्याच्या अखेरच्या दिवशी आज सौराष्ट्रने आपल्या नियोजनाप्रमाणे गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात वर्चस्व राखत. महाराष्ट्राला दुसऱ्या डावात 78 षटकात सर्वबाद 267 धावांवर रोखले. त्यामुळे सौराष्टपुढे विजयासाठी 117 धावांचे आव्हान होते. सकाळी रोहित मोटवाणीने तडाखेबाज खेळी करत 180 चेंडूत नाबाद 120 धावांची खेळी केली. त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत एकाकी खिंड लढवली. कर्णधार अंकित बावणे(25),नौशाद शेख (26) वगळता इतर फलंदाज सौराष्ट्रच्या धमेंद्र जडेजाच्या गोलंदाजीपुढे टिकाव धरू शकले नाही. तो महाराष्ट्रासाठी कर्दनकाळ ठरला. त्याने एकाच षटकात भरवशाचे अक्षय पालकर, सत्यजित बच्छाव आणि अनुपम संकलेचा या तिघांना बाद करत हॅटट्रीक नोंदवत महाराष्ट्राची अवस्था बिकट केली. दुसऱ्या बाजूने हार्दिक राठोडने दोन चेतन सकारीयाने एक गडी बाद करत महाराष्ट्राचा डाव संपुष्टात आणला. 
 

विजयासाठी सौराष्ट्राची पराकाष्ठा 
विजयासाठी 117 धावांचे माफक आव्हान घेऊन सौराष्ट्र निर्विवाद विजयासाठी एक अतिरिक्त जादा गुण(बोनस गुण)मिळवेल,असे वाटत होते. मात्र मैदानात उतरलेल्या सौराष्ट्र संघालाही विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्यांच्या फलंदाजीची मदार असलेले स्नेहिल पटेल(15),पदार्पणात पहिल्या डावात शतक झळकविणारा विश्‍वराज जडेजा(5),शेल्डन जॅक्‍सन(7) यांना सत्यजित बच्छाव व समंत फल्लाहने झटपट बाद करत सौराष्ट्रची अवस्था 3 बाद 72 अशी करून टाकली. पण त्यानंतर आलेला अर्पित वासवदा व हार्विक पटेल यांनी फटकेबाजी केली. हार्विक(44) तर वासवदा (28 धावांवर बाद झाला. त्यांना चिराग खुराणा व बच्छावने तंबुत धाडले. 5 बाद103 अशी धावसंख्या असतांना कमलेश मकवाना व प्रितीश मंकड यांनी उर्वित धावा काढत(5 बाद 120 धावा) संघाला विजय मिळवून दिला. महाराष्ट्राकडून बच्छाव व खुराणा यांनी दोन तर समंद फल्लाहने एक गडी बाद केला. यावेळी हॅटट्रीक नोंदविणाऱ्या धमेंद्र जडेला सामनावीरांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे सामनाधिकारी,पंचांचा सत्कार केला. 
---- 

गोलंदाजी,फलंदाजी,क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतीत आमच्या संघाने सुरेख सांघिक खेळ केला. हे यश सांघिक खेळाचे असून नाशिकची खेळपट्टी अतिशय उत्तम तयार करण्यात आली होती तिचा आम्हाला फायदा झाला. चारही दिवस आम्ही धोरण आखतांना महाराष्ट्राचे सुरवातीचे पाच फलंदाज बाद करण्याचे आणि पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचे ठरवले. त्याप्रमात आम्ही यशस्वी झालो.पदार्पण करणाऱ्या विश्‍वराज जडेजाच्या 97 धावा आणि धमेंद्र जडेजाची हॅटट्रीकने संघाला बळ मिळाले. आता मुंबईविरूध्द आमचा खरा कस लागणार आहे. 
सिंताशू कोटक,सौराष्ट्र संघाचे प्रशिक्षक 

संक्षिप्त धावफलक 
महाराष्ट्र पहिला डाव-सर्वबाद 247 आणि फॉलोऑननंतर दुसरा डाव-सर्वबाद 267 -रोहित मोटवाणी-120-190 चेंडू,पंधरा चौकार,जय पांडे-28-60चेंडू,चार चौकार,राहूल त्रिपाठी-38-16 चेंडू,पाच चौकार,दोन षटकार अंकित बागवे-25-71 चेंडू, चार चौकार, नौशाद शेख-245-42 चेंडू,चार चौकार, अवांतर-4 
गोलंदाजी (दुसरा डाव) सौराष्ट्र-जयदेव उनाडकट-14.3-3-41-0,चेतन सकारीया-15.0-2-62-1,धमेंद्र जडेजा-17.2-3-55-7,हार्दिक राठोड-14.0-3-35-2,कमलेश मकवाना-7.0-0-41-0,प्रथमेश मंकड-6.0-1-30-0 
सौराष्ट्र पहिला डाव- सर्वबाद 398 आणि दुसरा डाव-5 बाद 120 (निर्विवाद विजय) अवांतर-7 
हार्विक देसाई-44-89 चेंडू,7चौकार,स्नेहिल पटेल-15-33 चेंडू,तीन चौकार,अर्पित वासवदा-28-29 चेंडूत,5 चौकार,मकवाना नाबाद9,मंकड नाबाद 7 
गोलंदाजी महाराष्ट्र(दुसरा डाव)- सत्यजित बच्छाव-16.0-5-41-2,अनुपम संकलेचा-3.0-0-15-0 अक्षय पालकर-1.0-0-18-0,समंद फल्लाह-6.0-2-8-1,चिराग खुराणा-8.1-0-35-2 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com