'क्विंटन डिकॉकने आम्हाला धक्काच दिला, पण....' | Quinton de Kock Replacement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Quinton de Kock Replacement
क्विंटन डिकॉकने आम्हाला धक्काच दिला, पण....'

'क्विंटन डिकॉकने आम्हाला धक्काच दिला, पण....'

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकाचा स्टार विकेटकिपर आणि बॅट्समन क्विंटन डिकॉकने (Quinton de Kock) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांच मोठा धक्का दिला. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा ११३ धावांनी दारुण पराभव झाला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका वाचवण्यासाठी दुसरी कसोटी जिंकणे दक्षिण आफ्रिकेला महत्वाचे आहे. मात्र त्या आधीच डिकॉकने निवृत्तीचा बॉम्ब टाकत सर्वांनाच धक्का दिला. (Quinton de Kock Sudden Retirement) याबाबत बोलताना संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी देखील तशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र त्यांनी डिकॉकच्या रिप्लेसमेंट बाबतही महत्वाची अपडेट दिली आहे. (Quinton de Kock Replacement)

हेही वाचा: गोलंदाजांची कामगिरी चोख, फलंदाजीत सुधारणा हवी : द्रविड

मार्क बाऊचर म्हणाले, 'डिकॉक सारखी गुणवत्ता असलेला खेळाडू या वयात निवृत्त होईल अशी कोणी कल्पनाच करु शकत नाही. असे खेळाडू ३५ ते ३६ वर्षापर्यंत क्रिकेट खेळतात.'

ते पुढे म्हणाले, 'आमच्यासाठी हा धक्काच होता. पण आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. डिकॉकची निवृत्ती निराशाजनक गोष्ट आहे. मात्र आम्हाला पुढे गेलच पाहिजे. आम्ही मालिकेच्या मध्यावर आहोत. त्यामुळे आम्ही या धक्क्यातून लवकरच सावरले पाहिजे. आम्हाला आता त्याच्या जागी येणाऱ्या खेळाडूवर लक्ष केंद्रीत करायला हवे. तेही क्विंटन डिकॉक संघासाठी जे करत होता ते करु शकतील अशी आशा करु.'

सेंच्युरियनवर दक्षिण आफ्रिका पराभूत झाल्यानंतर लगेचच क्विंटन डिकॉकने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली. डिकॉकने आपल्या घरच्यांबरोबर जास्त वेळ घावलण्यासाठी आपण कसोटीमधून निवृत्त होत असल्याचे प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात सांगितले होते.

हेही वाचा: मेस्सीसह PSG च्या तीन फुटबॉलपटूंना कोरोना

क्विंटन डिकॉकची रिप्लेसमेंट (Quinton de Kock Replacement) कोण असेल याबाबत मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सांगितले की, 'आम्ही कायल वेरेयनवर (Kyle Verreynne) मेहनत घेत आहोत. २४ वर्षाचा हा तरुण विकेटकिपर बऱ्याच काळापासून राष्ट्रीय संघासोबत आहे.

मार्क बाऊचर म्हणाले, 'मला कायल बद्दल थोडं वाईट वाटतं कराण तो अनेक दिवसांपासून आमच्यासोबत दौरे करत आहे. मात्र त्याला संघात स्थान मिळालेले नाही. तो आपल्या संधीची वाट बघत आहे. आम्ही त्याच्यासोबत काम करण्यास उशिरा सुरुवात केली.' (Kyle Verreynne)

बाऊचर पुढे म्हणाले, 'तो या व्यवस्थेत नवा आहे असं नाही. तो बराच काळ राष्ट्रीय संघासोबत आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की तो चांगली कामगिरी करुन दाखवले.'

हेही वाचा: SA vs IND : कोहलीची प्रेस कॉन्फरन्सला दांडी; द्रविड म्हणाला...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना आजपासून (दि. ३ जानेवारी) जोहान्सबर्ग येथे सुरु होत आहे. भारत मालिकेत १ - ० ने आघाडीवर आहे. भारत ही कसोटी जिंकून मालिका खिशात टाकण्याच्या तयारीत असेल. तर आफ्रिकेला कोणत्याही परिस्थितीत ही कसोटी जिंकावी लागेल.

Web Title: Mark Boucher Statement Over Quinton De Kocks Sudden Retirement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top