Mary Kom ends her long-standing marriage with Onler
सहावेळच्या वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिने तिच्या व पती ऑनलर यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर मौन सोडले. गेल्या अनेक दिवसांपासून मेरी कोम व ऑनलर यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या आणि आज अखेर तिनेच या चर्चा खऱ्या असल्याचे जाहीर केले. मेरी कोमने तिच्या सोशल अकाऊंटवरून ही माहिती दिली. मी आणि ऑनलर आता पती-पत्नी राहिलेलो नाही आणि आम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे, असे मेरीच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. याचवेळी मेरीने उद्योगपती हितेश चौधरी यांना डेट करणे किंवा दुसऱ्या बॉक्सरच्या पतीशी संबंध ठेवण्याच्या अफवांवरही भाष्य केले.