प्रशिक्षकांच्या पुरस्काराचा निर्णय मेरी कोमच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

भारतीय बॉक्‍सिंग महासंघाने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी संध्या गुरुंग आणि शिव सिंग यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. हे दोघेही राष्ट्रीय महिला संघाचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याच पुरस्काराचा निर्णय मेरी कोम घेणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय बॉक्‍सिंग महासंघाने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी संध्या गुरुंग आणि शिव सिंग यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. हे दोघेही राष्ट्रीय महिला संघाचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याच पुरस्काराचा निर्णय मेरी कोम घेणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारावरून दरवर्षी वाद होतात आणि या वेळच्या वादाची सुरुवात मेरी कोमच्या पुरस्कार निवड समितीतील समावेशाने झाली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालय प्रतिवर्षी खेळाडू, मार्गदर्शक, जीवनगौरव यासाराख्या विविध पुरस्कारासाठी चार समित्या असत; पण या वेळी एकच समिती आहे. आता मेरी आपल्या मार्गदर्शकांसाठी प्रयत्न करणारच, असे मानले जात आहे.

भारतीय बॉक्‍सिंग महासंघानेच काही दिवसांपूर्वी दिलेल्या पत्रकानुसार सध्या देशातील अव्वल महिला बॉक्‍सरबरोबर एका दशकापासून आहेत. शिव सिंग तीन दशकांपासून मार्गदर्शक आहेत. त्यांच्या ज्ञानाचा पुरुष; तसेच महिला बॉक्‍सरना फायदा झाला आहे. ते गतवर्षी नोव्हेंबरपर्यंत महिला संघाचे मुख्य मार्गदर्शक होते.

मेरीच्या मार्गदर्शकांनीच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी अर्ज केला आहे, याकडे केंद्रीय क्रीडा मंत्रालयातील वरिष्ठ आधिकाऱ्यांनी लक्षही वेधले होते. त्याचबरोबर कार्यरत असलेल्या खेळाडूंचा समितीत समावेश होत नाही. मात्र मेरी कोम सहा वेळची जगज्जेती आहे. ती खासदार आहे, याकडे लक्ष वेधले गेले. पण त्यानंतरही तिला आपल्या मार्गदर्शकांबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार कसा, अशी विचारणा होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mary kom will decide her coach''s award