esakal | इंडोनेशिया बॉक्‍सिंगमध्ये मेरी कोमला सुवर्णपदक
sakal

बोलून बातमी शोधा

Mary Kom wins a gold medal in Indonesia Boxing

सहा वेळा जगज्जेतेपद जिंकलेल्या मेरी कोमला इंडोनेशिया प्रेसिडेंट कप बॉक्‍सिंग स्पर्धेत 51 किलो गटातील सुवर्णपदक जिंकण्यास कोणतेही प्रयास पडले नाहीत. या स्पर्धेत भारताच्या चारही सुवर्णपदक विजेत्यांनी अंतिम फेरीत एकतर्फी हुकुमत राखली. 

इंडोनेशिया बॉक्‍सिंगमध्ये मेरी कोमला सुवर्णपदक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : सहा वेळा जगज्जेतेपद जिंकलेल्या मेरी कोमला इंडोनेशिया प्रेसिडेंट कप बॉक्‍सिंग स्पर्धेत 51 किलो गटातील सुवर्णपदक जिंकण्यास कोणतेही प्रयास पडले नाहीत. या स्पर्धेत भारताच्या चारही सुवर्णपदक विजेत्यांनी अंतिम फेरीत एकतर्फी हुकुमत राखली. 

माजी ऑलिंपिक ब्रॉंझ पदकविजेत्या मेरीने ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रॅंक्‍सविरुद्ध 5-0 असा एकतर्फी कौल मिळवला. तिने इंडिया ओपन स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते; पण ऑलिंपिक पात्रतेच्या पूर्वतयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आशियाई स्पर्धेतून माघार घेतली होती. 

दोन महिन्यांपूर्वी इंडिया ओपन जिंकल्यानंतर मेरी जागतिक स्पर्धेची पूर्वतयारी जाणून घेण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाली होती; पण स्पर्धा संपल्यानंतरच्या ट्विटमध्ये तिने आपण सुवर्णपदकामुळे खूष आहोत, एवढेच म्हटले आहे. भारतात गतवर्षी झालेल्या जागतिक स्पर्धेत मेरीने सुवर्णपदक जिंकले होते. आता रशियातील स्पर्धेतही हेच तिचे लक्ष्य असेल. 

दरम्यान, मोनिका (49 किलो), जमुना, तसेच सिमरनजित यांनीही सुवर्णपदक जिंकले. मोनिका व जमुनाने 5-0; तर सिमरनजितने 4-0 असा विजय मिळवला. पुरुषांच्या स्पर्धेत नीरज स्वामीने पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकताना 49 किलो गटाच्या अंतिम सामन्यात बाजी मारली. अनंता प्रल्हाद 52 किलो गटात सर्वोत्तम ठरला. नीरजने 4-1; तर अनंताने 5-0 अशी बाजी मारली.

loading image