IND vs NZ : पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत केले अनेक विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Zeeland Defeat India In 1st ODI

IND vs NZ : पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत केले अनेक विक्रम

New Zeeland Defeat India In 1st ODI : टॉम लॅथम (नाबाद 145) आणि केन विलियम्सन (94) यांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल 221 धावांची भागीदारी रचत भारताचे 306 धावांचे आव्हान 47.1 षटकातच पार केले. न्यूझीलंडने पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 7 विकेट्स राखून पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून पदार्पण करणाऱ्या उमरान मलिकने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडचा हा मायदेशातला सलग 13 वा वनडे विजय होता. यापूर्वी त्यांनी 2015 मध्ये सलग 12 वनडे सामने जिंकले होते. याचबरोबर केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांनी वनडेमधील चौथ्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्त भागीदारी रचली. यापूर्वी इंग्लंडच्या मॉर्गन आणि रवी बोपाराने 226 धावांची नाबाद भागीदारी रचली होती. विशेष म्हणजे न्यूझीलंडने वनडेमध्ये भारताविरूद्ध फक्त दुसऱ्यांदा 300 पार धावसंख्या चेस केली. यापूर्वी 2020 मध्ये हॅमिल्टनमध्ये त्यांनी 338 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

हेही वाचा: Shikhar Dhawan : शिखर धवनची टी 20, कसोटीत संघातून डच्चू दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाला मी...

न्यूझीलंडने भारताचे 307 धावांचे आव्हान पार करताना सावध सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र शार्दुल ठाकूरने फिन अॅलना 22 धावांवर बाद केले. त्यानंतर केन विलियम्सन आणि डेवॉन कॉनवायने भागीदारी रचत किवींना अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र भारताची स्पीडगन उमरान मलिकने कॉनवॉयला 24 धावांवर बाद करत भारताला दुसरे यश मिळून दिले.

उमरान मलिकने आपल्या पहिल्याच स्पेलमधील पाचव्या षटकात त्यात तीव्रतेने आणि वेगाने मारा करत न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज टिपला. त्याने अनुभवी डॅरेल मिचलला 11 धावांवर बाद करत भारताची तिसरी आणि स्वतःची दुसरी विकेट मिळवली. मात्र यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने टॉम लॅथमच्या साथीने संघाचा डाव सावरला. त्याने संघाला 33 षटकात 175 धावांपर्यंत पोहचवले.

केन विलियम्सनने टॉम लॅथमच्या साथीने चौथ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली. विलियम्समन आणि लॅथम दोघांनीही अर्धशतक ठोकत न्यूझीलंडला मजबूत स्थितीत पोहचवले. दरम्यान, शार्दुल ठाकूर टाकत असलेल्या 40 व्या षटकात टॉम लॅथमने तब्बल 25 धावा चोपून आपले शतक पूर्ण केले. याचबरोबर न्यूझीलंडने देखील सामन्यावरील आपली पकड अजून मजबूत केली. या षटकापूर्वी लॅथम 77 धावांवर होता. त्यानंतर षटक संपेपर्यंत त्याने शंभरी गाठली होती.

यानंतर लॅथमने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवत 104 चेंडूत 145 धावा ठोकल्या. तर केन विलियम्सनने नाबाद 94 धावा करत न्यूझीलंडचा विजय 47.1 षटकातच पार केला.

हेही वाचा: Washington Sundar : फिनिशर कार्तिकला 'सुंदर' कॉम्पिटिशन; वॉशिंग्टनचे स्ट्राईक रेट पाहून जडेजालाही भरली धडकी?

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 7 बाद 306 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर शिखर धवन (72) आणि शुभमन गिल (50) यांनी 124 धावांची शतकी सलामी देत पाया रचला होता. यावर नंतर श्रेयस अय्यरने 80 तर वॉशिंग्टन सुंदरने 16 चेंडूत 37 धावा करत कळस चढवला. संजू सॅमसनने देखील 36 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन आणि टीम साऊदीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...