INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण 

India-and-west-indies
India-and-west-indies

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल.

वास्तविक पहाता हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अफलातून खेळी केली नसती तर सामन्याचा निकाल बदवलला असता आणि 0-2 अशा पिछाडीनंतर कदाचीत उद्या व्हाईटवॉश टाळण्यासाठी लढण्याची वेळ आली असती, पण फलंदाजीही करायची आणि थक्क करणारा झेलही पकडायचे इतरांनी मात्र चुकांपासून बोध घ्यायचा नाही असे म्हणायची वेळ विराट कोहलीवर आली आहे. 

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. ेट्‌न्टी-20 क्रमवारीतही भारत पाचव्या तर वेस्ट इंडीज 10 व्या स्थानावर आहे. क्रमवारीतील ही तफावत कामगिरीत मात्र वेगळे चित्र स्पष्ट करत आहे. बुमरा, पंड्या यांची अनुपस्थिती आणि अधून मधून काही खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती त्यामुळे आम्ही ताकदवर संघ खेळवलेला नाही त्यामुळे आम्ही पाचव्या स्थानापर्यंत घसरलो असावे असे विराट कोहली म्हणाला होता. गेल्याच महिन्यात लखनौमध्ये झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती. 

भारतीय संघात बदल नक्की 
पहिल्या दोन सामन्यांसह मालिका जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा भारतीयांचा विचार कधीच मागे पडला आहे आता अस्तित्व टिकवण्यासाठी उद्याच्या सामन्यात बदल करावे लागणार आहेत. पूर्णतः अपयशी ठरत असलेल्या दीपक चहरऐवजी महम्मद शमी आणि वॉशिंग्टन सुंदरऐवदी कुलदीप यादव हे दोन बदल संभवत आहेत. कदाचीत श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडे किंवा संजू सॅमनलाही संधी मिळू शकते. 

क्षेत्ररक्षणाचा कसून सराव 
भारतीय संघाला सध्या चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि मनिष पांडे त्यात तरबेज आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत तर अपयशी ठरलेलाच आहे पण पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात त्याने एक झेल सोडला होता. रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररणात चुका झाल्या होत्या त्यामुळे आज भारतीयांनी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला. 

वानखेडे कोणाचे होम ग्राऊंड? 
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड या दोघांसाठी वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड असेल, पण त्यावर करंडक कोण उंचावणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आयपीएलच्या अनुभवाचा फायदा पोलार्डला होईल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमंस यांनी व्यक्त केला आहे. 

षटकारांची स्पर्धा 
सध्याच्या वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेल किंवा आंद्र रसेल असे स्पोटक फलंदाज नसले तरी त्यांच्या प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची खासियत बागळून आहे. भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक षटकार वेस्ट इंडीजनेच मारलेले आहेत आणि ते विक्रम त्यांनी पहिल्या (15) आणि दुसऱ्या (12) सामन्यात केलेले आहेत. त्यानंतर वानखेडेवर त्यांनी 2016 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत 11 षटकारांची माळ ओवली होती. टी-20 च्या संपूर्ण इतिहासात सर्वाधक षटकार स्वीकारणाऱ्या देशात भारत पहिला आहे. त्यामुळे उद्या षटकारांचा अधिक पाऊस कोण पाडणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल आणि मालिकेचेही भवितव्य अवलंबून असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com