INDvsSA : मयांक मला तुझी बॅट देऊन टाक! मी पण खूप धावा करेन : डीकॉक

वृत्तसंस्था
Friday, 4 October 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात दुसऱ्या दिवशी चर्चा झाली ती केवळ एका खेळाडूची, मयांक अगरवालची.

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात दुसऱ्या दिवशी चर्चा झाली ती केवळ एका खेळाडूची, मयांक अगरवालची. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात होताच त्याने शतक पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने द्विशतकही केले. अशातच आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डीकॉक आणि मयांक अगरवाल यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये डीकॉक अत्यंत कुतूहलाने मयांकच्या बॅटकडे पाहत आहे. हा फोटो पाहून डीकॉक त्याला मला तुझी बॅट देऊन टाक असे नक्कीच म्हणल्याचा भास होतो. चाहत्यांनी सुद्धा या फोटोवर अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Caption this... #INDvSA

A post shared by Team India (@indiancricketteam) on

मयांक आगरवालचे कसोटी क्रिकेटमधले पहिले शतक पूर्ण झाले. उपहाराला काही मिनिटे बाकी असताना रोहित शर्मा 176 धावा काढून केशव महाराजला बाद झाला. त्याच्या पाठोपाठ पुजारा, कोहली आणि रहाणेही बाद झाले. मात्र,  या कशाचाच मयांक आगरवालवर परिणाम होत नव्हता. मयांक फिरकी गोलंदाजांवर हल्ला चढवत द्विशतकी मजल मारून गेला. 23 चौकार आणि 6 षटकार मारून 215 धावा काढणारा मयांक आगरवाल बाद झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला अभिवादन केले. 

दरम्यान 7 बाद502 धावसंख्येवर विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. केशव महाराजने 55 षटके टाकून 189 धावा देत 3  फलंदाजांना बाद केले. थकल्या अवस्थेत 20 षटकांचा सामना करताना दक्षिण आफ्रिकेने एडियन मार्करम आणि डी ब्रुईनची मोलाची विकेट गमावली जेव्हा अश्विनने भन्नाट ऑफ स्पीन टाकून त्याची मधली यष्टी हलवली. दुसर्‍या दिवशीचा खेळ संपयला आला असताना अश्विनने डी ब्रुईनला बाद करून अजून एक धक्का दिला.  नाईट वॉचमन पीटला जडेजाने बोल्ड करून पाहुण्यांची अवस्था अजून गंभीर केली. खेळ थांबलाव गेला तेव्हा फलकावर 3 बाद 39  धावा दिसत होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayank Agarwal and Quinton de Cock photo gets hilarious comments