Mayank Agarwal Century Ranji Trophy
Mayank Agarwal Century Ranji Trophysakal

Ranji Trophy : इंग्लंड मालिकेपूर्वी अग्रवालने ठोकले आक्रमक शतक! दोन वर्षांपूर्वी खेळली होती शेवटची कसोटी

Published on

Mayank Agarwal Century Ranji Trophy : इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, मात्र शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघाची निवड तीन आठवड्यांनंतर केली जाणार आहे.

पहिल्या दोन सामन्यांतील खेळाडूंची कामगिरी आणि या काळात खेळल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतील त्यांची चांगली कामगिरी हा या निवडीचा आधार असेल. टीम इंडियाच्या बॉलिंग लाइनअपमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नसली तरी काही दिग्गज खेळाडू फलंदाजीत नक्कीच प्रभाव पाडू शकतात.

Mayank Agarwal Century Ranji Trophy
Yuvraj Singh : 5 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती! आता 'सिक्सर किंग' युवराज घेणार टीम इंडियात मोठी जबाबदारी?

चेतेश्वर पुजाराने नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावून पुनरागमनाच्या आशा उंचावल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यासोबतच मयंक अग्रवालनेही रणजीमध्ये शतक झळकावून रेड बॉल गेममध्ये फॉर्ममध्ये परतला आहे. या दोन्ही खेळाडूंनी पुढील काही सामन्यांमध्ये अशाच मोठ्या खेळी खेळल्या तर ते इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी आपला दावा मजबूत करू शकतात.

Mayank Agarwal Century Ranji Trophy
Ind Vs Afg 2nd T20 : इंदूरमध्ये आज कसे आहे हवामान? सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा मूड

रणजी ट्रॉफीमध्ये मयंक अग्रवाल कर्नाटकचा कर्णधार आहे. त्याने शनिवारी गुजरातविरुद्ध अप्रतिम शतक झळकावले. त्याने 124 चेंडूत 109 धावांची खेळी केली. मयंकच्या या खेळीमुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात कर्नाटक संघ मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येथे गुजरातने पहिल्या डावात 264 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्नाटक संघाने 5 गडी गमावून 328 धावा केल्या होत्या.

मयंक बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या कसोटी संघाबाहेर आहे. मार्च 2022 मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. कसोटी क्रिकेटमधील सततच्या खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com