Mayank Agarwal : कमबॅकची तयारी.... मयांक अग्रवालची आली पहिली प्रतिक्रिया

Mayank Agarwal Health Update : मयांक अग्रवालला अगरतळा विमानतळावरून थेट रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Mayank Agarwal
Mayank Agarwal esakal

Mayank Agarwal Health Update : भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालची अगरतळा विमानतळावर अचानक तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आलं. अग्रवालने एका पाऊचमधील विषारी द्रव्य पाणी समजून पिलं होतं. त्यानंतर त्याला अती दक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं

आता मयांक अग्रवालनेच त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर रूग्णालयातील फोटो शेअर केला. त्याला कॅप्शन दिलं की मला आता बरं वाटतंय. मी कमबॅकची तयारी करतोय.'

Mayank Agarwal
Jay Shah ACC President : मोठी घोषणा! BCCI चे सचिव जय शाह सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष

भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालच्या प्रकृतीला असलेला धोका टळला आहे. त्याने आजच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली. त्याने सांगितले की मला आता बरं वाटतंय मी लवकरच मैदानावर परतणार आहे.

मंगळवारी मयांक अग्रवालने विमानात अनावधानाने विषारी द्रव्य सेवन केलं होतं. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली अन् त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करावं लागलं.

अगरतळावरून दिल्लीला जाणाऱ्या विमानातून उतरल्यानंतर मयांकला एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मयांकरने नुकतेच त्रिपुराविरूद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 26 आणि दुसऱ्या डावात 29 धावा केल्या. मयांकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कर्नाटक संघाने त्रिपुरा संघाचा 29 धावांनी पराभव केला. सामना झाल्यानंतर ते परतत होता.

Mayank Agarwal
Shikhar Dhawan : धवन, होस्ट करिष्मा अन् लॉ ऑफ अट्रॅक्शन... शिखरच्या पॉडकास्टची जोरदार चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com