Shikhar Dhawan : धवन, होस्ट करिष्मा अन् लॉ ऑफ अट्रॅक्शन... शिखरच्या पॉडकास्टची जोरदार चर्चा

Shikhar Dhawan law of attraction: शिखर धवनचा पॉडकास्ट चर्चेत आलाय, त्यासोबत होस्ट करिष्मा मेहताही चर्चेत आली.
Shikhar Dhawan law of attraction
Shikhar Dhawan law of attractionesakal

Shikhar Dhawan law of attraction : भारताचा अनुभवी क्रिकेटपटू शिखर धवनने आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल नुकतेच एका पॉडकास्टमध्ये बोलला. ह्युमन्स ऑफ बॉम्बे (Humans of Bombay podcast) या पॉडकास्टमध्ये शिखर धवनने आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगांबद्दल बोलला. त्याने आपल्या आयुष्याच्या पुस्तकाची काही पानं पालटली.

आधीची पत्नी आयशा मुखर्जी, मुलगा झोरावर यांच्या नात्याबद्दल देखील बोलला. तसचे आयपीएल 2024 च्या हंगामात पंजाब किंग्जच्या कॅप्टन्सीबाबत देखील त्यानं मनमोकळ्या गप्पा मारल्या.

दरम्यान शिखर धवनने सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहलीला आपले प्रेरणास्थान मानले. त्याने लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल देखील बोलला. यावेळी बोलताना होस्ट करिष्मा मेहतासोबत (Karishma Mehta) त्याने चेष्टा मस्करी करत पॉडकास्ट लाईटर मोडवर देखील नेला.

Shikhar Dhawan law of attraction
Mumbai Cricket Team : धोनीचा पठ्ठ्या बनला मुंबईचा उपकर्णधार! दमदार कामगिरीनंतर मिळाली मोठी जबाबदारी

शिखर धवन पॉडकास्टमध्ये म्हणाला की, तो लॉ ऑफ अट्रॅक्शनला मानणारा व्यक्ती आहे. त्यावेळी होस्ट करिष्मा मेहता देखील लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बोलत होती. तिने सांगितले की तिने देखील लॉ ऑफ अट्रॅक्शनसंदर्भाताली एक वर्कशॉप केला आहे असे सांगितले.

त्यावेळी शिखर धवनने करिष्माला विचारलं की तुम्ही मला देखील अट्रॅक्ट केलं? त्यावर करिष्मा लाजली मात्र हुशारी दाखवत एक मजेदार उत्तर दिलं.

शरिष्मा म्हणाली की, 'लॉ ऑफ अट्रॅक्शनची चर्चा होत आहे माझा देखील यावर विश्वास आहे. मी हे थेअरी मानते. कालच मी याबाबतचे एक वर्कशॉप केलं.' यावर धवन म्हणाला की, तुम्ही मला देखील अट्रॅक्ट केलं का? त्यावर करिष्मा म्हणाली की, 'मला विश्वास आहे की ही मुलाखत 100 टक्के अट्रॅक्टेड आहे.'

Shikhar Dhawan law of attraction
IND vs ENG : विराट कोहलीने आईमुळे कसोटी मालिकेतून घेतली माघार...; काय आहे व्हायरल बातमीमागील सत्य?

शिखर धवनने या पॉडकास्टमध्ये आपलं बालपण, कुटुंबाकडून मिळणारा पाठिंबा, मोनेट क्लब, प्रेरणा स्थान, आयुष्यातील शिस्त आणि क्रिकेटमधील चढ उतार यांच्याबद्दल उलगडा केला. तसेच धार्मिक, आधात्मिक यात्रा आणि समाधान याच्याबद्दल देखील त्याने आपलं मत व्यक्त केलं.

यात त्याने क्रिकेटर्सची ग्लॅमसर लाईफ, वर्ल्डकप 2023 च्या संघात न निवडलं जाणं, नेतृत्व, उद्दिष्टांची आखणी, मुलगा झोरावर, पत्नीसोबतचा घटस्फोट, मुलाची कस्टडी यावर देखील खुलेपणाने चर्चा केली. शिखर धवन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेलणं हे आपल्या प्लॅनिंगमध्ये नाहीये असं मानतो. सध्या त्याचं एकच गोष्टीवर त्याचं लक्ष केंद्रित असून ती गोष्ट म्हणजे पंजाब किंग्जचं नेतृत्व करत असताना आयपीएलची चॅम्पियनशिप जिंकून देणं!

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com